डॉ. शंतनू अभ्यंकर - लेख सूची

नास्तिकांचे अध्यात्म

सध्या इये मराठीचिये देशी नास्तिक मेळाव्यांचा हंगाम आहे. आयोजनातील वीरश्री पहाता लवकरच नास्तिकांसाठी आरक्षणाची मागणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, सावधान!!! त्याचवेळी हे ‘असले’ मेळावे घेऊन काय साध्य होणार? ह्या प्रश्नावर घमासान चर्चा झडत आहेत. एकुणांतच नास्तिकांत हाणामाऱ्या फार. सगळेच शहाणे, तेंव्हा असे होणारच. त्यात सर्व नास्तिकही समान नाहीत. त्यातही देव नाहीच अशी खात्री असलेले/ल्या, …

अज्ञानकोश

पुस्तकांमधील ‘शामची आई’ जशी आठवणीत आहे; तशी कित्येक पुस्तकंसुद्धा. अशीच एक आठवण. मी लहान असताना एकदा शास्त्रीजींकडे (तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी) बाबांचं काही काम होतं. ते मलाही घेऊन गेले. एका विद्वान व्यक्तीला आपण भेटणार आहोत एवढीच माझी समज. मी गेलो. पुस्तकांच्या गराड्यातच ते बसले होते. त्यांची आणि बाबांची काय चर्चा झाली हे काही मला कळत नव्हतं, …

शुद्ध कुतूहलापोटी, पुस्तके रसाळ गोमटी

पुस्तक: कुतूहलापोटीलेखक: अनिल अवचटप्रकाशक: समकालीन प्रकाशन ‘कुतूहलापोटी’, हे डॉ. अनिल अवचटांचं नवं कोरं पुस्तक.  ‘शुद्ध कुतूहलापोटी, पुस्तके रसाळ गोमटी’ असं बेलाशक म्हणावं, इतकं हे बेफाट आहे. मुखपृष्ठावर आहेत, चक्क लहान मूल होऊन रांगणारे, या अफाट सृष्टीकडे कुतूहलानी बघणारे, दस्तूरखुद्द डॉ.अवचट. लहान मुलाची उत्सुकता, जिज्ञासा आणि आश्चर्य इथे त्यांच्या चेहऱ्यावर विलसत आहे. हे पुस्तक रोएन्टजेन ह्या …

मॉबी डिक

लढाई ही जशी माणसा-माणसातील असते तशीच ती माणूस आणि प्राणी अशीही असते. तरबेज लेखक अशी गोष्ट सांगता सांगता ‘माणूस’ समजावून सांगतो. ‘मला ईशमाइल म्हणा’ या तीन शब्दांनी सुरू होणारी मॉबी डिक ही अशीच एक गाजलेली आणि गाजणारी जुनी (१८५१) इंग्लिश कादंबरी. लेखक: हरमन मेलव्हिल. एका व्हेल-मारी जहाजावर, ‘पेक्वोड’वर, घडणारी ही गोष्ट. अहाब हा तिचा कप्तान. …

कोपनहेगेन

युद्ध म्हटलं की आठवतं दुसरे महायुद्ध. अमेरिकेनं जपानवर अणुबॉम्ब टाकला आणि सारं जग ह्या कल्पनातीत संहारानी हादरून गेलं. ह्या प्रकारात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे सहभागी असलेले शास्त्रज्ञही पूर्णपणे हादरून गेले. अणुबॉम्ब हा जपानवर हल्ला होता, तसाच तो शास्त्रज्ञांच्या सद्सद्विवेकावरही हल्ला होता. कित्येकांनी निर्जीव फिजिक्स सोडलं आणि अधिक सजीव, अधिक मानवी असं जीवशास्त्र जवळ केलं. अणुबॉम्ब बनवण्यात …

असं केलं तर..

करोनाच्या लाटांवर लाटा फुटत आहेत. या साथीने आपल्या आरोग्यव्यवस्थेतल्या अनेक त्रुटी उघड्या पाडल्या आहेत. यातील काही आपल्याला आधीच माहीत होत्या. लोकसंख्येच्या मानाने डॉक्टरांची कमतरता ही त्यातली एक.   पण ज्या साथीमुळे ही कमतरता ठसठशीत झाली, त्याच साथीदरम्यान, साथीसारख्याच पसरलेल्या तंत्रज्ञानाने, यावर मात करणे शक्य आहे. इंटरनेट आणि आभासी उपस्थितीतील शिक्षण आता अचानक पुढ्यात आले आहे. ह्याचे तोटे आहेत तसे फायदेही …

पत्रोत्तर (अंबुजा साळगावकर व परीक्षित शेवडे ह्यांच्या प्रतिसादावर डॉ. शंतनू अभ्यंकर ह्यांचे उत्तर)

स. न. माझ्या, ‘या मार्गानेच जाऊया’ (सुधारक, मे २०२०) या लेखाचा प्रतिवाद करणारे डॉ. शेवडे व अंबुजा साळगावकर यांचे टिपण वाचले. पारंपरिक आणि पूरक उपचार हे आपोआप जसे उपयुक्त ठरत नाहीत तसे ते निरर्थकही ठरत नाहीत. पण ते उपयुक्त आहेत हा दावा करायचा तर त्याला सबळ पुरावा हवा. जी औषधे/शस्त्रक्रिया शास्त्रीय कसोटीवर उतरतात ती आपोआपच …

या मार्गानेच जाऊ या – डॉ. शंतनू अभ्यंकर

करोनाने सगळ्यांना दुग्ध्यात पाडले आहे. विशेषतः आरोग्यकर्मींना. नवी साथ आली म्हणताच देशोदेशीचे वैद्य, हकीम आपापले बटवे घेऊन सरसावले आहेत. बटवेच नाही तर बावटेही आहेत त्यांच्या हातात. त्या त्या देशाला त्या त्या देशीच्या देशी औषधांचा अभिमान आहे. तेंव्हा आपलंच खरं असं सांगायची एक चढाओढ लागली आहे. आमच्या पूर्वापार चालत आलेल्या प्रथापरंपरा, जडीबुटीची जादुई दवा, आता आपली कमाल …

शिक्षणात लैंगिकताशिक्षणाचा उतारा हवाच हवा

वेळोवेळी उघडकीस येणाऱ्या लैंगिक अत्याचारांच्या घटनांचा धिक्कार करावा तेवढा थोडाच. पण यावर दीर्घमुदतीचा आणि सर्वात परिमाणकारक उपाय म्हणजे, मुलामुलींना अगदी शालेय जीवनापासून लैंगिकताशिक्षण देणे. दुर्दैवाने ‘फाशी’, ‘नराधम’, ‘हिंसा’ वगैरेच्या चर्चेत हा मुद्दा बाजूलाच राहतो. लैंगिकताशिक्षणाला नाव काहीही द्या. ‘जीवन शिक्षण’ म्हणा, ‘किशोरावस्था शिक्षण’ म्हणा किंवा आणखी काही म्हणा. पण व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि इंटरनेटच्या जमान्यात पुढच्या …